दुचाकीने वळण घेताना झाला घात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

वळणमार्गावरून वळत असलेल्या दुचाकीला भरधाव बोलेरोने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर फाट्याजवळ घडली.

    वर्धा : वळणमार्गावरून वळत असलेल्या दुचाकीला भरधाव बोलेरोने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर फाट्याजवळ घडली. चंदा सुरेश लाहांडे (रा. मांडवा) असे मृत महिलेचे, तर किरण भास्कर कोसडे (रा. डोंगरगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

    पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरण कोसडे व चंदा लाहंडे हे नंदोरी येथून नारायणपूर झोडींग येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. नारायणपूर फाट्यावरूळ गावाकडे वळण रस्त्यावरून दुचाकी वळविताना चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव बोलेरो (एमएच 32 एजे 4464) चालकाने जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला, तर किरण कोसडे हे गंभीर जखमी झाले.

    घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी तुळशीराम सदानंद पोहणकर (रा. मुरपाड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करत आहेत.