फेसबुकवरील जाहिरात पाहून महिलेची फसवणूक

फेसबुकवर चपाती सेंटरची जाहिरत देणे एका महिलेला महागात पडले असून, सायबर चोरट्याने लष्कराच्या कॅन्टीनमधून बोलत असल्याची बतावणीकरून त्यांची ३० हजार रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी ४० वर्षीय व्यावसायिक महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पुणे : फेसबुकवर चपाती सेंटरची जाहिरत देणे एका महिलेला महागात पडले असून, सायबर चोरट्याने लष्कराच्या कॅन्टीनमधून बोलत असल्याची बतावणीकरून त्यांची ३० हजार रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी ४० वर्षीय व्यावसायिक महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, चोरट्यावर आयटी अॅक्ट व फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे अन्नपुर्णा चपाती सेंटर आहे. त्याची जाहिरात त्यांनी फेसबुकवर केली होती. यावेळी चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला व लष्कराच्या कॅन्टीनमधून बोलत असल्याची बतावणी केली. त्यांना चपात्यांची ऑर्डर द्यायची असल्याचे सांगत एक क्यूआर कोड पाठविला. तो स्कॅन करण्यास सांगितले आणि प्रथम ६ हजार पाठवा, अशी विनंतीही केली. महिलेने पैसे पाठविताच त्यांच्या खात्यातून चोरट्यांनी ३० हजार रुपये ऑनलाईन  ट्रान्सफरकरून फसवणूक केली. अधिक तपास पोलीस करत आहेत.