कुर्ल्यातील आंबेडकर नगर, गरीब मोहल्ला येथे दरड घरावर कोसळून एका महिलेचा मृत्यू

जिथे दरड कोसळली तिथे साळुंखे कुटुंबाचे किचन होते. ज्यात लता साळुंखे हे स्वयंपाक करीत होत्या. त्यांच्या अंगावर ही दरड कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कुर्ला नर्सिंग होम मध्ये उपचारास दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

    मुंबई : कुर्ला (Kurla) येथे असलेल्या आंबेडकर नगर, गरीब मोहल्ला येथे दरड (Land Slide) आणि घर घरावर कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे. लता साळुंखे असे मयत महिलेचे नाव आहे. आज सकाळी अचानक ही दरड खाली असलेल्या साळुंखे कुटुंबाचा घरावर कोसळली.

    जिथे दरड कोसळली तिथे साळुंखे कुटुंबाचे किचन होते. ज्यात लता साळुंखे हे स्वयंपाक करीत होत्या. त्यांच्या अंगावर ही दरड कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कुर्ला नर्सिंग होम मध्ये उपचारास दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या ठिकाणी हा विभाग विकासकाने विकासासाठी घेतला आहे. मात्र अजून ही इथला विकास झाला नसल्याने अशा घटना वारंवार होत असल्याचे स्थानिक सांगत आहेत.