डोंबिवलीमधील आजदेपाडा परिसरात भर रस्त्यात महिलेची छेडछाड, स्थानिक तरुणांनी दिला चोप

डोंबिवली आजदेपाडा परिसरात राहणारी महिला काल रात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतत होती .एक रोड रोमियो तिचा पाठलाग करत होता.

    भर रस्त्यात कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाला स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप देण्यात आला आहे. घटना काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील आजदे पाडा परिसरात घडली. प्रीतम गायकवाड असे या तरुणाचे नाव असून स्थानिकांनी त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

    डोंबिवली आजदेपाडा परिसरात राहणारी महिला काल रात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतत होती .एक रोड रोमियो तिचा पाठलाग करत होता. अंधाराचा फायदा घेत या रोड रोमियोने महिलेचा गळा दाबत तिच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करत आरडा ओरड सुरू केली. आरडा ओरड एकूण स्थानिक तरुणांनी धाव घेतली. हा रोड रोमियो पळून जात असताना स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून चांगलाच चोप दिला आहे.

    घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना देत या रोड रोमियोला पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रीतम गायकवाड असे या रोड रोमियोचे नाव असून मानपाडा पोलिसांनी प्रीतमला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीतम गायकवाड हा अंधेरी मरोळ येथे राहणारा असून तो डोंबिवलीत त्याच्या नातेवाईकांकडे आला होता.