Professors murder smacks of immoral relationship strangulation by wife and lover

    पुणे : अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेशी अश्लील वर्तन करून तिला बंदुकीचा धाक दाखविण्यात आल्याची घटना बाणेर परिसरात घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत अनंत गाडे, असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. गाडेवर विनयभंग, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला आणि गाडे ओळखीचे आहेत. महिला बाणेर रस्ता परिसरातील एका उपाहारृहाजवळून निघाली होती. त्यावेळी गाडेने तिला अडवले. तिच्याशी अश्लील वर्तन करुन अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले. महिलेने त्याला नकार दिला. तेव्हा गाडेने मोटारीत ठेवलेली बंदुक दाखविले. तुझ्यासह कुटुंबीयांना जीवे मारू, अशी धमकी गाडेने दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.