लिव्ह इन पार्टनरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, तलावात उडी मारुन संपवल आयुष्य!

लिव्ह-इन पार्टनरसोबत वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळुन महिलेने तलावात जाऊन आत्महत्या केली.

नवी मुंबई : लिव्ह इन रिलेशनाशिपमध्ये ( live-in relationship)अनेत तरुण तरुणीमध्ये वाद झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एकमेकांच्या ओढीनं एकत्र राहण्याचा हट्ट नंतर एखाद्या गुन्ह्याला जन्म देणार याची पुसटशीही कल्पना या जोडप्याांना नसते. सुरुवातीला गोडी गुलाबीने राहिल्यानंतर काही कारणामुळे वाद झाल्यास हे कपल टोकाचे निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार ठाण्यात घडला आहे. लिव्ह इन पार्टनरच्या (live-in partner) छळाला कंटाळून येथे एका महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिच्या पार्टनरला अटक करण्यात आली असुन तपास सुरू आहे. 

नेमका प्रकार काय?

नवी मुंबईतील पनवेल परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत महिला तिच्या 52 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरसोबत येथे एका फ्लॅटमध्ये राहत होती. सुरुवातीला आनंदाने राहिल्यानंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले. तिच्या लिव्ह इन पार्टनर तिच्यावर संशय होता की ती त्याच्याशी एकनिष्ठ नाही. तिचं दुसऱ्या दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर आहे. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. तो तिला मारहाणही करत होता. घटनेच्या दिवशीही  26 मार्च रोजी याच मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळुन तिने तलावात जाऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सध्या आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.