suicide

एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतानाच एका तरुणीने आपल्या घराच्या खोलीतच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मोर्शी शहरातील प्रज्ञा कॉलनी येथे शुक्रवारी (दि.22) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

    मोर्शी : एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतानाच एका तरुणीने आपल्या घराच्या खोलीतच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मोर्शी शहरातील प्रज्ञा कॉलनी येथे शुक्रवारी (दि.22) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

    पूजा गौतम तायडे (वय 25) असे मृतक तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. पूजा ही आपल्या आई- वडिलांसोबत प्रज्ञा कॉलनी, सिंभोरा रोड येथे राहत असून तिचे काही दिवसांपूर्वी साक्षगंध झाले होते व एप्रिल महिन्यामध्ये तिचा विवाह होणार होता. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजताचे दरम्यान राहत्या घरी तिने आपल्या खोलीत जाऊन स्लॅबच्या हुकला ओढणीने गळफास लावला. घरच्यांना ती लटकलेली आढळून आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे उपस्थितानी तिला खाली उतरवून लगेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरानी तिला मृत घोषित केले.

    उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर तरुणीच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून मृतक तरुणीचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.