गळा कापून मृत्यूची वाट पाहणाऱ्या तरुणाला जीवदान; कोरेगांव पार्क पोलिसांची कामगिरी

आर्थिक नैरश्यातून स्वत:चा गळा कापून मृत्यूची वाट पाहणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणासाठी पुणे पोलीस देवदुत बनले अन् त्याला मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढत जीवदान दिले. कोरेगांव पार्कमधील एका हॉटेलात ही घटना घडली. कोरेगांव पार्क पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली असून, यामिनिमित्त त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

    पुणे : आर्थिक नैरश्यातून स्वत:चा गळा कापून मृत्यूची वाट पाहणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणासाठी पुणे पोलीस देवदुत बनले अन् त्याला मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढत जीवदान दिले. कोरेगांव पार्कमधील एका हॉटेलात ही घटना घडली. कोरेगांव पार्क पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली असून, यामिनिमित्त त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

    त्याच झाल अस, संबंधित तरूण विवाहित असून, त्याला एक मुलगी व एक मुलगा आहे. तो हडपसरमधील आकाशवाणी केंद्र परिसरात राहण्यास आहे. एका मोठ्या कंपनीत तो नुकताच प्रमोशन होऊन मॅनेजर देखील झाला आहे. परंतु, हा तरुण कर्ज बाजारी झाला आहे. त्यातून तो आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता.
    दरम्यान, पोलीस नियत्रंण कक्षाला एका तरुणाने फोनकरून माहिती दिली की, त्याच्या मित्र आत्महत्या करत असल्याचे सांगितले. तसेच, तो कोरेगांव पार्क भागात असावा अशीही माहिती मिळाली. लागलीच नियत्रंण कक्षाने ही गोष्ट कोरेगांव पार्क पोलिसांना सांगितली. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ व पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ यांना संबंधित तरुणाची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. रात्रगस्तीवरील सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे व पोलीस हवालदार चालक कांबळे, सुनिल भोसले व इतरांनी या तरुणाची माहिती घेण्यास सुरूवात केली. फोन करणाऱ्या तरुणाकडून त्याचा मोबाईल क्रमांक घेतला.

    आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाशी संपर्क साधण्यास सुरूवात केली. पण, तो मात्र फोनला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे आणखीच परिस्थिती बिकट बनली. परंतु, सहाय्यक निरीक्षक लिगाडे यांनी वारंवार या तरुणास फोन केला. शेवटी त्याने फोन उचलला अन् पोलीस म्हणताच “रडत-रडत, साहब मुझे जीना नहीं. मेरे बिवी बच्चों की तरफ ध्यान देने को मेरे पिताजी और रिश्तेदारों को बोलो’ असे म्हणून ढसाढसा रडण्यास सुरूवात केली. त्याही परिस्थितीत लिगाडे यांनी या तरुणाचे समुपदेशन करण्यास सुरूवात केली. त्याला फोनवरच बोलत ठेवून त्याच्याकडून पत्ता विचारला. त्यावेळी तो सॉफ्टी सिझन्स छाबडा हाउस या हॉटेलात असल्याचे सांगितले.

    लागलीच पोलिसांनी येथे धाव घेऊन बंद दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तर, हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृत्यूची वाट पाहत असल्याचे दिसून आले. लागलीच त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्याला वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला गेला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, पोलीस अंमलदार हिले, कांबळे, सुनिल भोसले यांनी केली.