दोन मोटारसायकलच्या धडकेत एका तरुणाचा  मृत्यू 

बेबेडोहोळ गावात 17 जून रोजी किर्लोस्कर कॉलेजजवळ चांदखेड रोडवर दोन मोटारसायकलच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. सचिन मेगळे (वय 25 वर्षे, रा. सावरदारी, तालुका खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

    पिंपरी: बेबेडोहोळ गावात 17 जून रोजी किर्लोस्कर कॉलेजजवळ चांदखेड रोडवर दोन मोटारसायकलच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. सचिन मेगळे (वय 25 वर्षे, रा. सावरदारी, तालुका खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
    याबाबत रोहित शिंदे (वय 21 वर्षे, रा. शिवणे) यांनी शिरगाव पोलिस चौकीत फिर्याद दिली आहे. श्रीधर तिले (वय 20 वर्षे, रा. शिवणे) हा आरोपी असून तो पवना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
    शिरगाव पोलिस चौकीचे हवालदार अतुल भोसले म्हणाले, की फिर्यादी व त्यांचा मित्र जो आरोपी आहे असे दोघे  केटीएम मोटारसायकल MH01, बीएल 1758 वर शिवणे ते नेरे दत्तवाडी येथे बेबेडोहोळ मार्गे जात होते. आरोपी ही मोटारसायकल चालवत होता.
    आरोपीने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने व अविचाराने, निष्काळजीपणे चालवून सचिन मेगळे याच्या मोटारसायकल नं एमएच 14 सीक्यू 6046 ला समोरून जोरात धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. फिर्यादी किरकोळ जखमी झाला आहे. तिघांना एकच ऍम्ब्युलन्सने पवना हॉस्पिटलला नेण्यात आले होते, पण मेगळेचा मृत्यू झाला.