जालन्यात प्रेमप्रकरणातून तरुणाला टोळक्याकडून मारहाण; उपचारादरम्यान झाला मृत्यू

जालन्यात प्रेमप्रकरणातून तरुणाला पाच ते सहा जणांनी रविवारी (दि.14) रात्री जबर मारहाण केली होती. यात वीरेंद्र महेंद्र शेळुते (रा.इंदेवाडी) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    जालना : जालन्यात प्रेमप्रकरणातून तरुणाला पाच ते सहा जणांनी रविवारी (दि.14) रात्री जबर मारहाण केली होती. यात वीरेंद्र महेंद्र शेळुते (रा.इंदेवाडी) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    दरम्यान, उपचार सुरू असताना 17 एप्रिल रोजी रात्री या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी गुरुवारी या तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कदीम जालना पोलिस ठाण्यात आला होता.

    संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशाराही दिला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी व त्याचा भाऊ विजेंद्र शेळके याच्या फिर्यादीवरून पाच ते सहा जणांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मृताचा भाऊ विजेंद्र याच्या फिर्यादीनुसार, मयत विजय वीरेंद्र याचा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली. नेमकी घटना कोठे घडली याचा शोध लागला नसून या प्रकरणात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली.