RSS च्या अभ्यासिकेत गोळीबार, संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

भंडारा पोलिस स्टेशन परिसरात हेडगेवार चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारत आहे. या इमारतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत असे स्व. अण्णाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालय आणि अद्यावत अभ्यासिका केंद्र आहे. या वाचनालयात अचानकपणे चार वाजता गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून उपस्थितांसह परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

    भंडारा – येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासिकेत झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. अतुल वंजारी (२८ रा. गणेशपूर ता. भंडारा) असे मृताचे नाव आहे. तर, गंगाधर निखारे (४०, रा. पवनी) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

    भंडारा पोलिस स्टेशन परिसरात हेडगेवार चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारत आहे. या इमारतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत असे स्व. अण्णाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालय आणि अद्यावत अभ्यासिका केंद्र आहे. या वाचनालयात अचानकपणे चार वाजता गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून उपस्थितांसह परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. गोळीबारामुळे सर्वत्र धावपळ सुरू झाली. अशात एक तरुण अवस्थेत जखमी झाल्याचे आढळून आले.

    दरम्यान घटनेनंतर आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तर, गंभीर अतुलला पोलीस आणि नागरिकांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. अतिरक्तस्त्रावामुळे जखमी अतुलचा मृत्यू झाला.