तळेगावात किरकोळ वादातून तरुणावर चाकूने वार; आरोपीला अटक

किरकोळ कारणातून वाद घालून एका तरुणावर गळ्यावर चाकूने जिवघेणा हल्या करण्यात आला. यामध्ये संबंधित तरुण हा गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील तळेगाव येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

    दारव्हा : किरकोळ कारणातून वाद घालून एका तरुणावर गळ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये संबंधित तरुण हा गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील तळेगाव येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. नारायण दोडके असे जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे.

    15 डिसेंबर रोजी तळेगाव येथे किरकोळ कारणावरून आरोपी गुरुदास उर्फ नारायण जयराम चव्हाण याने नारायण दोडके याच्यावर जीवघेणा हल्ला केला. नारायन घोंगडे हा ग्राम पंचायत चौकात बसलेला असताना आरोपी गंरूदास चव्हाण याने अचानक मागुन येऊन नारायान धोंगडे याचे केस पकडून धारदार कटरने माणेवर सपासप वार केले. या हल्यात नारायन धोंगडे याची श्वासनलिका व अंन्न नलिका कापली जाऊ

    न प्रचंड रक्तस्ताव झाला.

    आरोपी गुरूदास चव्हाण हा तेथून पळून गेला गंभीर जखमी नारायण धोंगडे यास प्रथम दारव्हा व नंतर यवतमाळ येथील शासकीय जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांनी रात्रीच जिल्हा रूग्णालय यवतमाळ व नंतर घटनास्थळी भेट दिली.

    दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी स्टॉपसह घटनास्थळी भेट देऊन आरोपीचे शोध मोहीम सुरू केली. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून स्वतः ठाणेदार कुलकर्णी, सुरेश राठोड यांनी नेर तालुक्यातील वाणगाव येथून मुसक्या आवळल्या.