उधारी मागितल्याने तरुणावर कोयत्याने वार

उधारीचे पैसे मागतिल्यावरून हातगाडी चालक तरुणावर तिघांनी कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी राहुल पिसे उर्फ टिप्या (वय २०, रा. लक्ष्मीनगर) याला अटक केली आहे.

    पुणे : उधारीचे पैसे मागतिल्यावरून हातगाडी चालक तरुणावर तिघांनी कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी राहुल पिसे उर्फ टिप्या (वय २०, रा. लक्ष्मीनगर) याला अटक केली आहे. तर, दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत मुकीम शकील अहमद (वय २८) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली आहे.

    दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुकीम याची गरम मसालाची हातगाडी आहे. तो हातगाडीवर मसाला विकतो. दरम्यान, राहुल पिसेकडे उधारी आहे. त्या उधारीचे पैसे मागितले होते. त्याचा राग आल्याने त्याने साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर कोयत्याने वार केले. तर, सोडविण्यास आलेल्या नागिरकांना धमकावत तेथे दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.