Shocking! Wife stoned to death in Pune; Suicide of husband; Murder at the behest of Savat and the girl

रुमसमोर लघवी केल्याचा जाब विचारत असताना दोघांमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून (Youth Murder in Nashik) करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केला असून, त्यास अटक करण्यात (Criminal Arrested) आली आहे.

    वणी : रुमसमोर लघवी केल्याचा जाब विचारत असताना दोघांमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून (Youth Murder in Nashik) करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केला असून, त्यास अटक करण्यात (Criminal Arrested) आली आहे. ही घटना रविवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घडली असून, हकनाक जीव गमावल्यामुळे दिंडोरीतील औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

    याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, सोईराकुमार रामप्रवेश रिकीयासन (वय 29, रा. अक्राळे एमआयडीसीसमोर, तळेगाव शिवार, ता. दिंडोरी) यास राजकुमार बैजनाथ बियार (रा. सिकणी, पो. बंका, ता. पदुआ, जि. गढवाल, राज्य झारखंड) याने रुमसमोर लघवी करतो या कारणावरुन कुरापत काढून हातातील चाकूने सोईराकुमारच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार करुन जखमी केले. सदरचे भांडण योगेश विश्वेश्वर रिकीयासन (रा. बिहार, ह. रा. अक्राळे एमआयडीसीसमोर, तळेगाव शिवार) याने पाहिले व हा वाद टोकाला जाऊ नये. यासाठी योगेश सदर भांडण सोडविण्यासाठी गेला असता रागाच्या भरात राजकुमार याने किचनरुममध्ये जाऊन योगेशच्या मानेवर डाव्या बाजूस चाकूने वार करुन निर्घृण खून केला.

    दुसऱ्याचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या योगेशला हकनाक आपला जीव गमवावा लागला. या घटनेची माहिती मिळताच कळवण उपविभागीय अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, पोलिस उपनिरीक्षक पी. बी. कावळे, अमोल पवार व ढोकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, संशयित राजकुमार यास अटक करण्यात आली आहे.