17 वर्षीय तरूणीवर बळजबरी करून तो करायचा ‘असंकाही’; निर्जनस्थळी नेत असायचा अन्…

गेल्या महिन्याभरापासून तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. पीडितेला 18 वर्षे पूर्ण होण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे तो वय पूर्ण होताच पळून लग्न करू, अशी बळजबरी करत होता.

    नागपूर : जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानंतर लग्नासाठी दबाव टाकत कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या प्रियकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोंटी पसेरकर (वय 23, रा. यशोधरानगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    पीडित 17 वर्षीय मुलगी सध्या पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. ती दहावीत असताना मोंटीशी ओळख झाली. मोंटी हा चारचाकी वाहन धुण्याचे काम करतो. पीडितेची आई शाळेत नोकरी करते तर वडील व्यावसाय करतात. मोंटीचे वडील महापालिकेत स्वच्छता कर्मचारी आहेत. पंधरा वर्षांची असताना मोंटीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अलिकडे मोंटी तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. तिला नेहमी निर्जन आणि झाडीझुडूपात नेऊन बळजबरी करायचा.

    गेल्या महिन्याभरापासून तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. पीडितेला 18 वर्षे पूर्ण होण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे तो वय पूर्ण होताच पळून लग्न करू, अशी बळजबरी करत होता. मात्र, तिने शिक्षण पूर्ण करण्याचा हट्ट धरीत लग्नास नकार दिला होता. त्यामुळे मोंटीने तिला अपहरण करून लग्न करण्यासाठी बजावले.

    तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. 10 ऑक्टोबरला मोंटी तिला दुचाकीवर बसवून घरी घेऊन गेला. तेथे त्याने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि पळून जाण्यासाठी तयारी करण्यास सांगितले. तिने घडलेला सारा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पोलिसांत फिर्याद देण्यात आली.