केटरिंग व्यावसायिकाने 40 ऐवजी 37 कामगार आणल्याने झाला वाद; तरूणाने केला डोक्यावर चाकूने वार

केटरिंग व्यावसायिकाने (Catering Businessman) लग्नात 40 ऐवजी 37 कामगारांना आणल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादानंतर एका तरुणावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. जखमी तरुणाला आयसीयूमध्ये दाखल केले आहे.

    अमरावती : केटरिंग व्यावसायिकाने (Catering Businessman) लग्नात 40 ऐवजी 37 कामगारांना आणल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादानंतर एका तरुणावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. जखमी तरुणाला आयसीयूमध्ये दाखल केले आहे. दोन्ही गटांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    नागपुरीगेटच्या पाकीपुरा येथे राहणारे अहमद अब्दुल रहमान हे कॅटरिंगचा व्यवसाय करतात. गौस नगर येथील रहिवासी युनूस खान, युसूफ खान यांनी भावाचे लग्न असल्याने 40 कामगारांची मागणी केली होती. त्यासाठी युनूसने पाच हजार रुपये अॅडव्हान्सही दिले होते. पण कामगार अहमदने लग्नाच्या दिवशी 20 पुरुष आणि 17 महिलांना कामावर नेले. त्यानंतर अहमदने पैसे मागितले असता, मी नंतर देतो असे त्याला सांगितले. त्यानंतर अहमदने 29 नोव्हेंबर रोजी फोन करून युनूस खानला राजकमलच्या ऑटो गलीमध्ये बोलावले. त्यानंतर कमी पैसे आणण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावेळी त्याने अहमदला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

    यानंतर रात्री 10.45 वाजता युनूस खान युसूफ खान हे कॅन्टीन बंद करत असताना त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. दरम्यान ऑटोचालकांच्या मदतीने त्यांना इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.