suicide

मानसिक आजाराला कंटाळून एका तरुणाने साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या (Youth Suicide) केली. ही घटना भातकुली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आसरा गावात रविवारी (दि. 22) उघडकीस आली.

    अमरावती : मानसिक आजाराला कंटाळून एका तरुणाने साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या (Youth Suicide) केली. ही घटना भातकुली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आसरा गावात रविवारी (दि. 22) उघडकीस आली.

    निलेश किसन गुडधे (32, रा. आसरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणात भातकुली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नीलेश गुडधे हा मजुरीचे काम करीत होता. मात्र, सात ते आठ वर्षांपासून तो मानसिक आजारावर उपचार घेत होता. निलेशला मानसिक त्रास असल्यामुळे त्याची पत्नी मुलाला घेऊन एक महिन्यापूर्वी माहेरी निघून गेली होती.

    दरम्यान, सातत्याने बळावणारा आजार त्यानंतर घ्यावे लागणार उपचार या सर्वाला निलेश हा चांगला त्रस्त झाला होता. याचा आजाराला कंटाळून निलेश गुडधे या ३२ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.