‘मला माफ कर आई, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही’; आत्महत्या करून तरूणाने संपवलं जीवन

आरक्षणाच्या मुद्यावर (Maratha Reservation) महायुती सरकारने आश्वासन दिल्यानंतरही आत्महत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मूळच्या अकोल्यातील एका 19 वर्षीय तरुणाने पुण्यातील चाकणमध्ये आत्महत्या (Youth Suicide) केली.

    जालना : आरक्षणाच्या मुद्यावर (Maratha Reservation) महायुती सरकारने आश्वासन दिल्यानंतरही आत्महत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मूळच्या अकोल्यातील एका 19 वर्षीय तरुणाने पुण्यातील चाकणमध्ये आत्महत्या (Youth Suicide) केली.

    मराठा आरक्षण न मिळाल्याने निराश होऊन अभय गजानन कोल्हे याने आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोल्हे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कोल्हे यांच्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

    मराठा आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अभय कोल्हे त्रस्त झाल्याचे वृत्त आहे. त्याच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याला आपल्या आजारी आईच्या उपचाराची आणि बहिणीच्या शिक्षणाची जास्त काळजी वाटत होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत 25 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.