बहिणीच्या लग्नात चांगला नाचला, पाणी पिताना चक्कर आली अन् अक्षता पडण्यापूर्वी…

बहिणीवर लग्नाच्या अक्षता पडण्यापूर्वीच युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथे घडली. अजय दिलीप डहाळे (वय ३१) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पंचक गाव येथे संतोष व दिलीप डहाळे हे बंधू एकत्र राहतात. संतोष डहाळे यांच्या कन्येचे वैभवलक्ष्मी लॉन्स येथे विवाह सोहळा होता.

    नाशिकरोड : बहिणीवर लग्नाच्या अक्षता पडण्यापूर्वीच युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथे घडली. अजय दिलीप डहाळे (वय ३१) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पंचक गाव येथे संतोष व दिलीप डहाळे हे बंधू एकत्र राहतात. संतोष डहाळे यांच्या कन्येचे वैभवलक्ष्मी लॉन्स येथे विवाह सोहळा होता. त्यासाठी डहाळे परिवाराची लग्नाची सर्व तयारी झाली होती. नेमकं त्याचवेळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

    घरात लग्न असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. या विवाह सोहळ्याआधी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. एका बाजूला नववधूचे हात मेहंदीने रंगत असताना तिचे भाऊ, नातेवाईक आणि त्याचे मित्र परिवार डीजेच्या तालावर ठेका धरत नाचत होते. मात्र, नियतीच्या मनात काय असते, हे कोणी सांगू शकत नाही. नाचून झाल्यावर पाणी पिताना वधूचा चुलत भाऊ अजय दिलीप डहाळे (चिंटू) याला चक्कर आली. त्यामुळे त्याला पाणी दिले. मात्र, पाणी पिऊन झाल्याने अजयने बहिणीला सासरी पाठवण्याआधीच या जगाचा निरोप घेतला अन् क्षणात आनंदी मंडपात दुःखाचे सावट पसरले.

    डहाळे परिवार, सोनार समाज, पंचकसह संपूर्ण जेलरोड, नाशिकरोड शहर शोकामध्ये डुबले. अजय एकलहरा येथील एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षक सुपरव्हायझर म्हणून काम करत होता तर वडील दिलीप डहाळे हे पानदुकान चालवतात. सोमवारी दुपारी दसक अमरधाम येथे शोकाकूल वातावरणात अजयला शेवटचा निरोप देण्यात आला.