murder

मालेगाव शहरातील आयशानगर भागात म्हाडा प्लॉट, नूरबाग येथे सख्ख्या भावानेच लहान भावाच्या छातीवर चाकूने भोसकून जीवे ठार मारल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी खून करणारा मोठा भाऊ मुद्दसीर अहमद जमील अहमद अन्सारी (वय २५) याला आयशानगर पोलीसांनी अटक केली.

    मालेगाव : मालेगाव शहरातील (Malegaon Crime) आयशानगर भागात म्हाडा प्लॉट, नूरबाग येथे सख्ख्या भावानेच लहान भावाच्या छातीवर चाकूने भोसकून जीवे ठार मारल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी खून करणारा मोठा भाऊ मुद्दसीर अहमद जमील अहमद अन्सारी (वय २५) याला आयशानगर पोलीसांनी अटक केली.

    या घटनेची फिर्याद मयत जावीद अहमद जमील अहमद अन्सारी (वय 22) याचे वडील जावीद अहमद जलील अहमद मोहमद असगर अन्सारी (वय ६०) यांनी दिली. आरोपी व मयत हे फिर्यादीचे मुले असून, त्यांच्यात बाहेर जाण्यावरून व वडिलांना ढकलून देण्यावरुन वाद होत असताना मयत व आरोपीचे आई-वडील हे भांडण सोडविण्यास गेले. त्यावेळी आरोपी मुदशीर याने मयतास ‘तूने अब्बा को क्यों ढकेला’ असे रागविल्याने जावीद याने त्याच्या खिशातील चाकू काढून आरोपीच्या अंगावर वार केला. मात्र, त्याने वार चुकविल्याने चाकूचा वार फिर्यादीच्या वडिलांच्या हातावर लागून त्यातून रक्तस्त्राव झाला.

    आरोपी मुदशीर याला राग येऊन ‘तूने अब्बा को चाकू क्यों मारा, तेरा हमेशा का नाटक हो गया, तेरा आज खेल ही खतम करता हूँ’ असे म्हणून मयत जावीद अहमद याच्या डाव्या छातीवर चाकूने भोसकून त्यास जीवे ठार मारले.