वडगावात कोयत्याने सपासप वार करून २२ वर्षीय तरुणाचा खून; मावळ तालुक्यात खळबळ

वडगाव मावळ येथील २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने व तलवारीने तोंडावर आणि डोक्यात सपासप वार करून खून (Crime Vadgaon Maval) केल्याची घटना घडली आहे. विश्वजीत राजेंद्र देशमुख (वय २२, रा. संस्कृती सोसायटी वडगाव मावळ जि. पुणे) खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    वडगाव मावळ : वडगाव मावळ येथील २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने व तलवारीने तोंडावर आणि डोक्यात सपासप वार करून खून (Murder in Vadgaon Maval) केल्याची घटना घडली आहे. विश्वजीत राजेंद्र देशमुख (वय २२, रा. संस्कृती सोसायटी वडगाव, मावळ, जि. पुणे) खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना वडगाव येथील मातोश्री हॉस्पिटलजवळ सोमवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    वडगाव मावळात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तरुणांमध्ये कायद्याची भीती राहिली नसल्याचे दिसून येत आहे. विविध गुन्हे घडत आहेत. अशामध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महेश काशिनाथ गायकवाड (वय २८) यांनी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावच्या हद्दीतील मातोश्री हॉस्पिटलजवळील बस स्टॉप
    समोर रोडवर पूर्वी झालेल्या कुठल्यातरी भांडणाच्या पूर्ववैमनस्यातून सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास १० ते १२ अनोळखी इसमांनी दुचाकीवरील त्यांचे हातातील लोखंडी कोयते व तलवारीने विश्वजीत देशमुख यांच्या तोंडावर, गळ्यावर, डोक्यावर, हातावर वार करून खून केला.

    तसेच ही भांडणे सोडविण्यास गेलेल्या महेश गायकवाड (रा. वारंगवाडी) व अभिशेख अनंता ढोरे यांच्यावर देखील त्यांनी कोयत्याने व तलवारीने वार करून त्यांना जखमी केले आहे. याशिवाय त्यांच्या गाड्यांची तोडफोड करून नुकसान केल्याची फिर्याद महेश गायकवाड याने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दिली आहे.