नेरळ येथील अपघातात बदलापूरचा तरुण ठार; टेम्पोची-दुचाकीला धडक

कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर आज जिते येथील वळणावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणाचा मृत्यू (Youth Killed in Accident) झाला. मालवाहू टेम्पो रस्ता ओलांडून डिव्हायडर तोडून पलीकडील रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनांवर जाऊन आदळला आणि त्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या बदलापूर येथील तरुणाचा बळी गेला आहे.

    कर्जत : कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर आज जिते येथील वळणावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणाचा मृत्यू (Youth Killed in Accident) झाला. मालवाहू टेम्पो रस्ता ओलांडून डिव्हायडर तोडून पलीकडील रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनांवर जाऊन आदळला आणि त्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या बदलापूर येथील तरुणाचा बळी गेला आहे.

    बदलापूर येथील चार तरुण सकाळी बदलापूर येथून दोन दुचाकी यांच्यावर बसून कल्याण कर्जत रस्त्याने खोपोलीत इमॅजिका येथे पर्यटनासाठी निघाले होते. त्यावेळी राहुल यादव आणि गौरव लाड हे दोघे राहुल यांच्या बुलेटवर प्रवास करीत होते. नेरळ सीमा लॉनपासून पुढे असलेल्या जिते येथील वळणावर त्यांच्या दुचाकी कर्जतकडे जात असताना कर्जतकडून नेरळकडे मालवाहू टेम्पो येत होता. हा टेम्पो दुहेरी मार्गावरील डिव्हायडर तोडून नेरळ-कर्जत बाजूच्या रस्त्यावर घुसला आणि त्यावेळी राहुल यादव आणि गौरव लाड प्रवास करीत असलेल्या दुचाकीवर येवून आदळला.

    यामध्ये दुचाकीचालक राहुल यादव यांच्या पायाला गंभीर जखम झाली होती. तर त्या दुचाकीवर मागे बसलेला तरुण गौरव लाड याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. नेरळ पोलीस ठाणे येथे याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. टेम्पोचालक याला पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.