अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; शिंदेफळ येथील तरुण जागीच ठार

शेलूबाजार ते अकोला रोडवरील टोल नाक्याजवळ शनिवारी (दि.18) रात्री 8 वाजताच्या दरम्यान अज्ञान वाहनाच्या धडकेने मोटारसायकलस्वार ठार झाला. शिवाजी गजानन हेकड ( 31), रा. शिंदेफळ, ता. सेनगाव, जि. हिंगोली असे मृताचे नाव आहे.

    वाशीम : शेलूबाजार ते अकोला रोडवरील टोल नाक्याजवळ शनिवारी (दि.18) रात्री 8 वाजताच्या दरम्यान अज्ञान वाहनाच्या धडकेने मोटारसायकलस्वार ठार झाला. शिवाजी गजानन हेकड ( 31), रा. शिंदेफळ, ता. सेनगाव, जि. हिंगोली असे मृताचे नाव आहे.

    हिंगोली जिल्ह्यातील शिंदेफळ येथील शिवाजी हेकड हे वनोजा येथील संग्राम रवणे यांचे जावई होते. दिवाळीनिमित्त माहेरी असलेल्या पत्नीला घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून वनोजा येथे मोटारसायकलने येत असताना शेलूबाजार ते अकोला रोडवर टोल नाक्याजवळ अज्ञान वाहनाने मागून त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन मुली, आई व पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे.

    पवन राठी हे वैयक्तिक कामानिमित्त वनोजा येथे जात असताना त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी 108 वर ऍम्बुलन्सला कॉल केला असता बेल जात होती, परंतु प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे यावेळी शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात ऍम्बुलन्स उभी होती, याची माहिती मिळताच संबंधित वाहनचालकाला निरोप देऊन घटनास्थळी ऍम्बुलन्स बोलावून घेतली. मंगरूळपीर पोलिस स्टेशन येथे अपघाताची माहिती दिली.