चक्क बांबूपासून बनवली सायकल; पंढरपुरातील तरूणाचे यश

आपण आजपर्यंत लोखंडापासून बनवलेली सायकल, तसेच गँलोनाईजपासून बनवलेली सायकल पाहिलेली, वापरलेली आहे. परंतु, पंढरपूर येथील रहिवासी मिसाळ हे सध्या पुणे येथे नोकरीस आहेत. त्यांनी बांबूपासून सायकल बनवलेली आहे. ही सायकल पर्यावरणाला पोषक आहे.

    पंढरपूर : आपण आजपर्यंत लोखंडापासून बनवलेली सायकल, तसेच गँलोनाईजपासून बनवलेली सायकल पाहिलेली, वापरलेली आहे. परंतु, पंढरपूर येथील रहिवासी मिसाळ हे सध्या पुणे येथे नोकरीस आहेत. त्यांनी बांबूपासून सायकल बनवलेली आहे. ही सायकल पर्यावरणाला पोषक आहे. तसेच या सायकल बांधणी पूर्णता बांबूपासून बनवलेले आहे.

    रेझीन आणि नॅचरल फायबरपासून त्याची बांधणी केलेली आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून ते बांबूपासून बनवलेली सायकल ते वापरत आहेत. त्यांनी या सायकलवरून हजारो किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. नुकतीच त्यांनी पुणे ते पंढरपूर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकादशीच्या निमित्ताने ते शनिवारी पंढरपूर येथे दाखल झाले. पुणे येथून पहाटे चार वाजता निघून त्यांच्यासोबत 50 सायकलिस्टबरोबर त्यांनी एकूण दहा तासांमध्ये पुणे ते पंढरपूर असे 250 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले आहे.

    मिसाळ हे हे स्वतः डायबिटीसचे पेशंट असून, गेली 25 वर्ष ते सायकलचा सराव करतात ते निरोगी आहेत. डायबिटीस तसेच बीपीचा कोणताही त्रास आता सध्या त्यांना नाही. संपूर्ण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सायकलचा वापर लोकांनी करावा. असे त्यांचे आग्रहाचे आव्हान आहे. या बांबूपासून बनवलेल्या सायकलचे महत्व ते सांगत असताना पुढे म्हणाले, या सायकलला समोरून जर का धडक झाली तर कुठलीही मोडतोड होत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ही सायकल पर्यावरणपोषक असल्याने वजनास हलकी आहे. एकूण या सायकलचे वजन दहा किलो आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.

    पंढरपूर शहरातील सायकलप्रेमींना तसेच शहरातील रहिवाशांना त्यांनी आव्हान केले आहे की आपण दररोज सायकलचा सराव करावा. त्यामुळे संपूर्ण शरीर हे तंदुरुस्त राहते. गुडघेदुखी तसेच बीपीचा डायबिटीसचा कुठलाही त्रास शरीरास होत नाही. पंढरपूर येथील सायकलप्रेमींनी जर का एखादा लांबचा प्रवास जर सायकलवरून करायचा असेल तर निश्चितच मार्गदर्शन करू त्यांना सायकलबाबतची योग्य ती माहिती तसेच मार्गदर्शन जरूर करू, असे त्यांनी आवर्जून सांगितले.