
शहरात कोयतेधाऱ्यांनी दहशती माजविली असून, पोलिसांना देखील या कोयतेधाऱ्यांवर (Pune Crime) आवर कसा घालायचा असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असून, आता पोलिसांनी कोयता विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आदेश दिले आहेत.
पुणे : शहरात कोयतेधाऱ्यांनी दहशती माजविली असून, पोलिसांना देखील या कोयतेधाऱ्यांवर (Pune Crime) आवर कसा घालायचा असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असून, आता पोलिसांनी कोयता विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आदेश दिले आहेत. कोयता खरेदी करणाऱ्या नागरिकांकडून आधारकार्ड घेण्याची सक्ती (Aadhar Compulsory for Koyta) करण्यात आली आहे. त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.
शहरात कोयत्यांची खुलेआम विक्री सुरू आहे. हे कोयते शेतीअवजार म्हणून त्याला मान्यता आहे. पण, शेतकऱ्यांचा कोयत्याने आता रक्तांचे पाट वाहू लागले आहेत. गुन्हेगारांकडून त्याचा सर्रास वापर केला जाऊ लागला आहे. कोयते सहजरित्या मिळत असल्याने तो खुलेआम वापरला जात आहे. या कोयत्याने पुण्यात वेगळीच दहशत माजविली आहे. पुणेकरांसोबतच पोलिसांनी देखील त्याचा धसका घेतला आहे. कोयतेधाऱ्यांनी धुमाकूळ घातल्याने आता पोलिसांकडून बेकायदेशीर विक्रेत्यावरही कारवाई सुरू केली आहे.
अल्पवयीन मुलांकडे कोयते
अल्पवयीन मुले तसेच शाळकरी मुलांकडे देखील कोयता पाहिला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकात टोळक्याने किरकोळ वादातून एका महाविद्यालयीन मुलावर वार केले होते. त्यासोबतच शहरातील बोहरी आळी परिसरात गुन्हे शाखेने कारवाई करुन १३५ कोयते जप्त केले होते.
सहज उपलब्ध होताहेत कोयते
अल्पवयीन मुलांनाही सहज कोयते उपलब्ध होत असल्याने आता कोयते विक्रेत्यांना कोयते विक्रीबाबत निमय लागू केले आहेत. त्यानुसार, त्यांना आधारकार्ड सक्ती व मोबाईल क्रमांक, पत्ता आणि नाव घेण्याचे आदेश दिले आहेत.