aaditya athackeray

कोस्टल रोडचे (Coastal Road) काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिले.

    मुंबई: कोस्टल रोडचे (Coastal Road) काम मुंबईत पश्चिम किनारपट्टीवर (Road Work) विविध टप्प्यांमध्ये सुरू आहे. हे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिले.

    कोस्टल रोडच्या सुरू असलेल्या कामाचा मंत्री ठाकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सह पोलिस आयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. ठाकरे यांनी मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. संबंधित सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या सहकार्याने ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.