Aam Aadmi Party's Preeti Sharma Menon criticizes Maharashtra leaders for selling morality

सत्तापिपासू पक्षाला महाराष्ट्रातील जनतेकडे बघायला वेळ नसून जनसेवेसाठी यांना निवडून दिलंय परंतु, सत्तेसाठी आपली विचारधारा बदलायला हे धजावत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी खोचक टीका प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.

    मुंबई : सतेच्या हव्यासापोटी महाराष्ट्रातील नेत्यांनी नैतिकता पार विकून ते कुरघोडी करण्यात व्यस्त झाले आहे. महाराष्ट्रातील सद्याचे राजकारण गाठत अत्यंत खालची पातळी गाठत आहे, याचा आम्ही निषेध करतो, अशी टीका आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) मुंबई अध्यक्षा ( Mumbai President ) व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती शर्मा मेनन ( National Executive Member Preeti Sharma Menon) यांनी केली आहे.

    सद्या महाराष्ट्रातील राजकरणात हादरे देणारे भूकंप होत आहे. यावर बोलताना प्रीती शर्मा मेनन  (Preeti Sharma Menon)  म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर तसेच खेदजनक आहे. जनतेने कोणत्याही लोकप्रतिनिधींवर विश्वास ठेवू नये अशी वेळ आहे.  महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आणली आहे. त्यातच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सतत कुरघोड्या करणे व पक्षफोडीचे राजकारण करणे हे भाजपला अशोभनीय आहे, असे मत प्रीती शर्मा मेनन (Preeti Sharma Menon) यांनी व्यक्त केले.