पाथर्डीची आरती केदार खेळणार महिला क्रिकेट आयपीएल स्पर्धा

पाथर्डी तालुक्यातील हत्राळ येथे येथील शेतकरी कन्या आरती केदार हीची महिला टी २० आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

    पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील हत्राळ येथे येथील शेतकरी कन्या आरती केदार हीची महिला टी २० आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

    आयपीएल स्पर्धेसाठी निवड झालेली अहमदनगर जिल्ह्यातील आरती ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या वरिष्ठ महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरती केदार हिने सर्वाधिक १५ विकेट घेतल्या होत्या. यापूर्वी आरती केदार हिने महाराष्ट्र संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे.

    महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात आरती केदार हिने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. २०२१ मध्ये झालेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेसाठी आरती केदार ची निवड झाली होती. आता २३ मे पासून होणाऱ्या महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आरती केदार अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.