अभयसिंह जगताप यांचा विरोधकांना धसका; संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात सामाजिक कामांचा धुराळा

  म्हसवड/महेश कांबळे : माण-खटावचे युवा व डँशिंग नेतृत्व, युवकांचे आयडॉल ठरलेल्या अभयसिंह जगताप यांच्या सामाजिक कामाचा संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात धुराळा उडत असून, या धुरळ्यात त्यांचे राजकीय विरोधकही हरवले असल्याचे चित्र आहे. तर त्यांच्या कार्याचा धसका घेतलेल्यांनीच त्यांचे कार्यक्रम आता पोलीसांच्या मदतीने हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर महिलावर्गातून व युवा वर्गातून उमटू लागल्या आहेत.
  माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी या छोट्याशा गावात जन्मलेल्या या युवकाने राजकारणात अपघाताने उडी घेत अल्पावधीतच अनेकांची अक्षरशा झोप उडवली आहे. राजकारणाच्या पहिल्याच टप्प्यात या युवकाने कोणताच राजकिय अनुभव नसताना केवळ युवकांच्या साथीने गावची ग्रामपंचायत एकहाती जिंकत राजकिय मात्तबरांना इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या पवार साहेबांच्या खास मर्जीतील युवा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या या तरुणाने पवार यांच्या सांगण्यावरुनच माण – खटावमधील राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. पुढे राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झालेवरही या युवकाने पवार साहेबांची साथ सोडली नाही, त्याचेच फळ म्हणुन त्यांचेकडे माढा लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणुन पाहीले जावु लागले आहे. मात्र उमेदवारी मिळे अथवा न मिळो माझ्यासाठी उमेदवारी महत्वाची नाही तर पवारसाहेबांचे आशीर्वाद महत्वाचे आहे असे म्हणत या युवकाने संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघ पिंजुन काढण्यास सुरुवात केली असुन यानिमीत्ताने जगताप यांनी मतदार संघात शरद क्रिडा महोत्सवाचे आयोजन करीत ठिकठिकाणी विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यांच्या या क्रिडा महोत्सवामध्ये गावोगावातील हजारोंच्या संख्येने युवक सहभागी होत असल्याने अभयसिंह जगताप हे युवकांचे आयडॉल ठरले आहेत.
  युवावर्गाची ताकत त्यांच्या पाठीशी वाढु लागल्याचे चित्र आता संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघात दिसु लागली असल्यानेच त्यांच्या विरोधकांमध्ये धडकी भरली आहे, कालपर्यंत जगताप यांना एक बच्चा आहे असे संभोधनारे त्यांचे विरोधक आता त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष देवु लागले आहेत, त्याचा प्रत्यय नुकत्याच करमाळा येथे अभयसिंह जगताप यांनी खास महिलांसाठी मकरसंक्रातीनिमीत्त आयोजीत केलेल्या होम मिनिस्टर च्या कार्यक्रमात सर्वांना आला या कार्यक्रमासाठी सुमारे ५ हजारांहुन अधिक महिलांनी सहभागी होत जगताप यांच्या पाठीशी आपण यापुढे राहणार असल्याचे दोन्ही हात उंचावुन सांगितले. युवा वर्गासोबतच महिला वर्गाचाही या युवकाला पाठींबा ठिकठिकाणी वाढतोय म्हटल्यावर सौरभैर झालेल्या जगताप यांच्या विरोधकांनी पोलीसांच्या मदतीने वेळेचे बंधन घालत हा कार्यक्रम १० वा. बंद पाडला त्यामुळे हजारो महिलांच्या उत्साहावर विरजन पडले, ही बाब लक्षात येताच त्याचक्षणी समयसुचकता दाखवत जगताप यांनी कोणत्याही माता – भगिणींनी नाराज होवु नये आज जरी हा कार्यक्रम बंद करावा लागला असला तरी आपण याच ठिकाणी उद्या हा कार्यक्रम पुर्ण करु असे जाहीर करताच हजारोंच्या संख्येने आलेल्या महिलांनी अभयसिंह जगताप तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत संपूर्ण करमाळा शहर दणाणुन सोडले. तर आनंदीत झालेल्या महिलावर्गाने जगताप यांच्या पाठीशी आपण यापुढे राहणार असल्याचे जणु अभिवचनच दिले.
  यानंतर त्याच रात्री त्यांनी करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण काका जगताप, युवक शहर अध्यक्ष अमीर तांबोळी, युवक तालुका अध्यक्ष केशव चोपडे, समाधान शिंगटे, सचिन नलवडे, किसान सेल तालुका अध्यक्ष रवी घाडगे, तालुका उपाध्यक्ष इरशाद पठाण यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या राणीताई वारे, जयमाला चौरे, महिला आघाडी शहर अध्यक्षा राजश्री कांबळे, तालुका अध्यक्षा नलिनी जाधव आदींशी चर्चा करून रविवारी पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले.
  रविवारी झालेल्या या कार्यक्रमाचे पहिले बक्षीस होंडा एक्टिवा केतुर नं.१(ता.करमाळा) येथील सुषमा महेंद्र कोकणे, दुसरे बक्षीस फ्रीज देवीचा माळ (ता.करमाळा) येथील शीतल श्रीकांत चव्हाण, तिसरे बक्षीस एलईडी टीव्ही चिकलठाण (ता.करमाळा) येथील माधवी गणेश बारकुंड तर आटा चक्कीचे चौथे बक्षीस करमाळा येथील कृष्णाजी नगरच्या तृप्ती रणजीत सुकळे यांनी पटकावले. अनपेक्षितपणे रविवारी सायंकाळी पाच वाजता पुन्हा घेतलेल्या या कार्यक्रमाला महीलावर्गाने शनिवार इतकीच उपस्थिती दर्शविली आणि रात्री दहा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. याशिवाय सोमवारी असलेल्या संक्रांतीच्या सणाला लाडक्या अभयदादांकडून मिळालेली पैठणी आवर्जून परिधान करून खासदार म्हणून अभयसिंह जगताप यांनाच पसंती असल्याची जणू पोचपावतीच दिल्याचे दाखवून दिले.
  नावातच सिंह असलेल्या अभयसिंह जगताप यांनी सध्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा माढ्यात धडाका उडवुन दिला असुन त्यांच्यासोबत येथील युवावर्गही मोठ्या प्रमाणावर काम करीत असलेला दिसुन येत आहे.