जवळपास ५० आमदार सहभागी होणार, काँग्रेसचा एक गट संपर्कात

संजय राऊत (Sanjay Raut) आमचे नेते आहेत. पण मी कोणाचेही अपहरण केलेले नाही. सगळे आमदार स्वखुशीने माझ्यासोबत आलेले आहे. माझ्यासोबत ४५ आमदारांचे संख्याबळ आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहे, असे एकनाथ शिंदेंनी भाष्य केले आहे.

    शिवसेना (Shivsena) नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड (Rebellion) अधिक तीव्र होत आहे. शिवसेनेचे जवळपास ४० आमदार आपल्यासोबत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या आमदारांना रात्री उशिरा गुवाहाटी (Guwahati) येथे नेण्यात आले आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ते भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेने भाजपासोबत (BJP) सरकार बनवावे, मंत्रिपद दिले नाही तरी चालेल अशी भूमिका आहे. तसेच, काँग्रेसचा (Congress) एक गट संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

    संजय राऊत (Sanjay Raut) आमचे नेते आहेत. पण मी कोणाचेही अपहरण केलेले नाही. सगळे आमदार स्वखुशीने माझ्यासोबत आलेले आहे. माझ्यासोबत ४५ आमदारांचे संख्याबळ आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहे, असे एकनाथ शिंदेंनी भाष्य केले आहे.

    गुवाहाटीमध्ये असलेले बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले की, आता आमच्यासोबत शिवसेनेचे ३३ आमदार आहेत आणि काही अपक्ष आहेत. आज आणखी काही आमदार दाखल होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा आकडा ३९ पर्यंत जाणार असून एकूण आमदारांची संख्या ५० पर्यंत नक्कीच जाण्याची शक्यता आहे. तसेच, काँग्रेसचेही काही आमदार सोबत येणार आहेत.

    बच्चू कडू म्हणाले की, आम्ही शिवसेनेला समर्पित होतो. शिवसेनेचे ७५ टक्के आमदार येथे आल्याने आम्हीही आलो. कोणतीही व्यक्तिगत नाराजी नाही. निधीतली विषमता आहे, शिवसेनेने त्याकडे लक्ष दिलेले नाही. मी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांना सांगितले की दोन्ही निवडणुकांमध्ये आम्ही सेनेलाच मत दिले, मग हे अचानक वातावरण तयार झाले आणि परिस्थिती बदलली.