विनायक मेटेंचा अपघात नसून घातपात? मेटेंच्या आईंनी व्यक्त केला ‘हा’ संशय

विनायक मेटे यांच्या मातोश्री लोचनाबाई मेटे (Matoshree Lochanabai Mete) यांनी माझा मुलगा अपघातात गेला नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. माझ्या मुलाला मारले आहे, हा डाव होता असा सुद्धा आरोप मातोश्री लोचनाबाई मेटे यांनी केला आहे.

    बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Marath reservation) लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे रविवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटे अपघाती निधन झाले. (Accident in Mumbai pune highway) त्यानंतर अवघ्या वयाच्या ५२ वर्षी हा मराठा योद्धा काळाच्या पडद्याआड गेल्यानं सर्वांनी हळहळ व्यक केली. त्यानंतर मेटे यांचे पार्थिव बीड (Beed) येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी रात्री उशिरा आणले. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मारण्याचा डाव होता असा संशय निर्माण होत असून, गाडीचा चालक (Driver) बेपत्ता झाल्यामुळं हा अपघात होता की, घातपात अशा दबक्या आवाजात चर्चा होत आहेत. त्यानंतर आता विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईंनी (Mother) वेगळा संशय व्यक्त केला आहे.

    दरम्यान, विनायक मेटे यांच्या मातोश्री लोचनाबाई मेटे (Matoshree Lochanabai Mete) यांनी माझा मुलगा अपघातात गेला नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. माझ्या मुलाला मारले आहे, हा डाव होता असा सुद्धा आरोप मातोश्री लोचनाबाई मेटे यांनी केला आहे. माझं लेकरु अपघाताने गेलं नाही, त्याला मारलं आहे. माझं लेकरु मरायसारखा नव्हता. जाणून बुजून माझं लेकरु मारलं, त्याची चौकशी करा, असं म्हणत या माऊलीने टाहो फोडला. मेटेंच्या आईंनी निर्माण केलेल्या संशयामुळं चर्चांना आणखी उधाण आलं आहे.