
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी व सत्ताधारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे बेताल वक्तव्य आणि महापुरुषांचा वारंवार होणारा अवमान प्रकरणी निषेधार्थ सोलापूर कडकडीत बंद करण्यात आला आहे.
सोलापूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी व सत्ताधारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे बेताल वक्तव्य आणि महापुरुषांचा वारंवार होणारा अवमान प्रकरणी निषेधार्थ सोलापूर कडकडीत बंद करण्यात आला आहे.
बंदमध्ये शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.एसटी स्टॅन्ड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सर्वपक्षीय राजकीय पक्ष आणि सामाजीक संघटनेकडून मोर्चा काढण्यात येत आहे. दुपारी २ वाजे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. आत्यवश्यक सेवा वगळता विविध व्यापारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोलापूर शहरातील मधला मारुती, नवी पेठ, बेगम पेठ तसेच मार्केट यार्ड मधील लिलाव व बाजार समितीचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद दिसून आले.
उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, प्रहार संघटना, एमआयएम, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, संभाजी आरमार, संभाजी ब्रिगेड असा सुमारे चार ते पाच हजारांचा समुदाय या मोर्चात सहभागी झाला आहे.