शिवीगाळ करण पडल चांगलंच महागात! वडगाव न्यायालयाने सुनावली दंडासह शिक्षा

चांदखेड येथील शेतजमिनीमध्ये जेसीबी मशीनच्या सहाय्याने साफसफाई सुरू असताना शिवीगाळ करणे एकाला महागात पडले असून या प्रकरणी वडगाव येथील मा. रा. ना. चव्हाण यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी खटल्यात तीन वर्षांनी निकाल दिला आहे.

    वडगाव मावळ : चांदखेड येथील शेतजमिनीमध्ये जेसीबी मशीनच्या सहाय्याने साफसफाई सुरू असताना शिवीगाळ करणे एकाला महागात पडले असून या प्रकरणी वडगाव येथील मा. रा. ना. चव्हाण यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी खटल्यात तीन वर्षांनी निकाल दिला आहे.

    चांदखेड येथील गट नंबर १०९, ११० येथे ०५/०५/२०१८ साली सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राजेंद्र माणिकराव गायकवाड ( रा. चांदखेड तालुका मावळ) यांनी फिर्यादी मुकेश तीर्थदास केसवानी यांना जेसीबीच्या साह्याने शेत जमिनीमधील गवत साफ करत असताना जेसीबी ऑपरेटर व कामगारांना अटकाव करत केसवाणी यांना शिवीगाळ केली होती.

    या विरोधात केसवाणी यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी तीन वेळा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यासाठी गेले होते. परंतु केसवाणी व गायकवाड यांच्या याआधीही जमिन गट न. १०७ गाव चांडखेड दिवाणी दावा संदर्भात दावा दाखल आहेत हे कारण देत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नव्हती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस प्रशासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल करत सखोल चौकशी केली.

    याप्रकरणी मा चव्हाण कोर्ट यांनी मंगळवारी (दि.१०) दिलेल्या निकालानुसार राजेंद्र गायकवाड यांना दोशी ठरविण्यात आले असून त्यानुसार कलम ५०४, ५०६ अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षण सुनावण्यात आली. तसेच पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. शिक्षा सुनावल्यानंतर शिवीगाळ करणार चांगलंच महागात पडल्याची चर्चा संपूर्ण कोर्टात होती.
    फिर्यादी तर्फे ॲड. ललित पवार यांनी सदरच्या खटला चालवला व आरोपी तर्फे ॲड संतोष गुंजाळ यांनी खटला चालवला.