व्हिडीओ व्हायरल करुन महिलेवर अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

मैत्रीपूर्ण संबंधाचा गैरफायदा घेऊन महिलेशी शारिरीक संबंध निर्माण केले. त्यानंतर गुपचूप व्हिडीओ काढला व तो एका वेबसाईटला अपलोड करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    पुणे : मैत्रीपूर्ण संबंधाचा गैरफायदा घेऊन महिलेशी शारिरीक संबंध निर्माण केले. त्यानंतर गुपचूप व्हिडीओ काढला व तो एका वेबसाईटला अपलोड करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    याप्रकरणी महेश हनुमंतराव टोटरे (वय २७, रा. लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३३ वर्षीय पिडीत महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार २०१८ ते २०२४ या कालावधीत घडला आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी महेश यांची ओळख होती. ओळखीतून त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. ओळखीचा फायदा घेत त्याने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्याने महिलेच्या न कळत व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ एका साईटवर अपलोड करून त्यांची बदनामी केली. त्यानंतर दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बळजबरीने त्यांच्यासोबत इच्छेविरूद्ध जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्तापित केले. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.