लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार; सहा महिन्यांपासून प्रकार होता सुरु

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार सहा महिन्यांपासून सुरु असल्याचे उघड झाले आहे. जेव्हा या तरूणाने लग्नास नकार दिला तेव्हा या पीडित तरूणीने गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली.

    परभणी : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार सहा महिन्यांपासून सुरु असल्याचे उघड झाले आहे. जेव्हा या तरूणाने लग्नास नकार दिला तेव्हा या पीडित तरूणीने गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    गंगाखेड शहरातील दक्षिण भागात राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीला याच भागातील अमोल गौतम साळवे या तरुणाने पोलीस भरतीचा सराव करायचा आहे, असे सांगत या परिसरात असलेल्या एका खाजगी शाळेच्या मैदानावर नेत अत्याचार केले. सहा महिन्यात सात ते आठ वेळा अत्याचार झाल्याने फिर्यादी तरुणीने लग्न करण्यासाठी अमोल साळवे याच्याकडे आग्रह धरला. तेव्हा अमोलने सांगितले की, ‘मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. लग्नासाठी परत मला बोलली तर तुला मारून टाकतो’, अशी धमकी दिली.

    याप्रकारानंतर अखेर तरुणीने आरोपी अमोल साळवे याच्याविरुध्द गंगाखेड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.