भाजपकडून सत्तेचा गैरवापर; संजय राऊतांच्या अटकेवरून शरद पवारांचे आरोप

शिवसेना नेते हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणावरून ईडीच्या ताब्यात आहेत. मात्र, त्यावर राष्ट्रवादी काहीही बोलण्यास तयार नाही. संजय राऊत यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप भाजपने केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले की, भाजपकडून सध्या सत्तेचा गैरवापर होत आहे. कारण राऊतांना अटकही त्यांनीच केली आणि आरोपही तेच करतात.

    मुंबई : येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सर्व विरोधकांची इच्छा आहे की, एकत्रितपणे लढावे; पण अजून तसा निर्णय झाला नाही, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) शिवतीर्थावरच झाला पाहिजे. कारण शिवतीर्थ म्हणजे शिवसेना (Shivsena) असेही त्यांनी सांगितले.

    शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणावरून ईडीच्या ताब्यात आहेत. मात्र, त्यावर राष्ट्रवादी काहीही बोलण्यास तयार नाही. संजय राऊत यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप भाजपने केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले की, भाजपकडून (BJP) सध्या सत्तेचा गैरवापर होत आहे. कारण राऊतांना अटकही त्यांनीच केली आणि आरोपही तेच करतात. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊतांना त्यांनाच अटक केली. त्यामुळे कुणी वाऱ्यावर सोडले हे वेगळे सांगायची गरज नाही, असे पवार म्हणाले.

    सध्या शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळावा घेण्यासाठी वाद सुरू आहेत; पण शिवतीर्थ आणि शिवसेना हे समीकरण आहे, असे मत शरद पवार यांनी मांडले. त्यावर भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.