
एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी (Solapur Crime) आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व 16 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी ठोठावली.
सोलापूर : एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी (Solapur Crime) आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व 16 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी ठोठावली.
दीपक उर्फ बादल दिलीप पवार (वय २५) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक याने फिर्यादीची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील तिला तिच्या घरातून जबरदस्तीने दुचाकीवरून लग्न करण्याच्या उद्देशाने पळवून नेले. त्यानंतर तिला औरंगाबाद येथे नेले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारिरीक व लैंगिक अत्याचार केले. म्हणून पीडितेच्या आईने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भाबड यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र पाठविले होते. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार रुपनर यांनी काम पाहिले.
हे प्रकरण विशेष न्यायाधीश आव्हाड यांच्या समोर चालले. यात सरकारपक्षातर्फे एकूण ८ व बचाव पक्षातर्फे २ साक्षीदार यांनी काम पाहिले. या प्रकरणात पीडिता, फिर्यादी, तपास अधिकारी तसेच डॉक्टरांची साक्ष व सरकारी वकीलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी दीपक पवार यास अत्याचारप्रकरणी दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व १६ हजारांचा दंड ठोठावला. तर आरोपीला मदत करणाऱ्या माणिक चव्हाण व वर्षा काळे या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.