राजन साळवी यांच्या कुटुंबाला देखील एसीबीची नोटीस; मी काय आहे, हे संपूर्ण मतदारसंघाला माहित आहे, नोटीसानंतर राजन साळवींची प्रतिक्रिया

साळवी कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसीनंतर, आता 20 तारखेला सकाळी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. तसेच मी कुठल्याही चौकशीला घाबरत नाही. वैभव नाईक यांना पहिली आणि नंतर मला आणि नितीन देशमुख यांना नोटीस  आली आहे.

मुंबई : कालच मविआचे  नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर आज मविआतील ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते व आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबालाही एसीबीनं (ACB) नोटीस पाठवली आहे. दरम्यान, साळवी कुटुंबाला 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे. त्यामुळं सूडभावनेनं शिंदे-फडणवीस सरकार राजकारण करत असल्याचा आरोप मविआतील नेत्यांनी केला आहे.

माझ्या मतदारसंघातील लोकांना माहित आहे

दरम्यान, या नोटीसानंतर राजन साळवी यांची प्रतिक्रिया समोर आली असून, राजन साळवी काय आहे, हे मतदारसंघातील लोकांना माहित आहे, असं साळवींनी म्हटलं आहे. माझ्या मालमत्ते विषयी 4 महिन्यांपूर्वी नोटीस आली होती, त्यावेळी मी सामोरा गेलो होतो. 2200 लोकांना नोटीस दिल्या आहेत. माझा सरकारी पीएला देखील नोटीस देण्यात आली आहे. माझ्या वडिलोपार्जित जामीन याची चौकशी करण्यात आली. माझ्या घरावर बँकेचं कर्ज आहे त्याला देखील नोटीस आली. आज सकाळी माझी पत्नी, सख्खे मोठे बंधू आणि मोठी वाहिनी यांना नोटीस एसीबीनं पाठवली आहे. पण माझ्याबद्दल लोकांना माहित आहे, असं साळवी म्हणाले.

20 तारखेला चौकशी

साळवी कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसीनंतर, आता 20 तारखेला सकाळी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. तसेच मी कुठल्याही चौकशीला घाबरत नाही. वैभव नाईक यांना पहिली आणि नंतर मला आणि नितीन देशमुख यांना नोटीस  आली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना नोटीस येत नाही आणि तिथे गेले की धूऊन निघतात. असं साळवी म्हणाले. भाजपाकडे सध्या सत्ता आहे, सत्ताधीश आहेत, केंद्रात राज्यात त्यांचं सरकार आहे. आणि म्हणून असा त्रास देण्याचं कामं ते करत आहेत. माझी आई यांची परिस्थिती गंभीर आहे, ती खूप आजारी आहे. आणि असं असताना देखील मी अधिवेशनात हजर राहिलो आहे, असं साळवी म्हणाले. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घराचीही पाहणी एसीबीकडून करण्यात आली होती. तसेच, त्यांना चौकशीसाठीही बोलावण्यात आलं होतं.