आमदार राजन साळवी यांच्या घरावर ACB चा छापा; रत्नागिरीतल्या निवासस्थानी चौकशी

ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू झाली आहे. रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेत.

    रत्नागिरी : ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू झाली आहे. रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेत.

    या सर्व घटनेनंतर राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चौकशीला सामोरे जायची माझी तयारी आहे. छापा नाही. या चौकशीला मी घाबरत नाही. ज्या दिवशी पहिली नोटीस आली त्याच दिवशी मला चौकशीला सामोरे जावे लागणार याची मानसिक तयारी झाली होती आणि मी चौकशीला सामोरे जाणारच, असे राजन साळवी म्हणाले.

    राजन साळवींच्या अडचणींत वाढ

    राजापूरचे उद्धव ठाकरे समर्थक आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळं निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत विभागानं काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलेलं. तसेच, काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं.