मराठा आरक्षणाबाबत सर्व मागण्या मान्य?; मनोज जरांगे 2 वाजता पुढची भूमिका जाहीर करणार

राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहचलं होतं. त्यांच्यात चर्चा झाली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत आता जरांगे पाटील 2 वाजता सरकारने दिलेली कागदपत्रे वाचून दाखविणार आहेत. 

    मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय. कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहचलं होतं. त्यांच्यात चर्चा झाली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत आता जरांगे पाटील 2 वाजता सरकारने दिलेली कागदपत्रे वाचून दाखविणार आहेत.

    “आपल्याला काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे. सरकारने काही कागदपत्रे दिली आहेत, ते वाचून दाखवणार आहे. झालेल्या घटना तुम्हाला सांगायच्या आहेत. आता आपण मोकळं माघारी जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

    दरम्यान, सर्वांना आवाज गेला पाहिजे, गैरसमज नको म्हणत साऊंड सिस्टिमची व्यवस्था झाल्यानंतर २ वाजता याबाबत जाहीर सभेत घोषणा करणार असल्याचेही जरांगेंनी सांगितले आहे. त्यामुळे जरांगे 2 वाजता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.