ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण अपघात; पिकअप चालकाचा जागीच मृत्यू तर ट्रकचालक गंभीर

भरधाव ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप वाहनचालकाचा केबिनमध्ये दबून जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात सिंदेवानी-बडेगाव मार्गावरील डोला घाटजवळ घडली.

    खापा : भरधाव ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप वाहनचालकाचा केबिनमध्ये दबून जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात सिंदेवानी-बडेगाव मार्गावरील डोला घाटजवळ घडली.

    सुरेश जितू असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. ट्रक चालक जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चालक सुरेश हा टाटा योद्धा पिकअप वाहन घेऊन बडेगावकडे येत होता. दरम्यान, मध्य प्रदेशकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने डोला घाटजवळ पिकअप वाहनाला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पिकअप वाहन चालकाचा केबिनमध्ये दबून जागीच मृत्यू झाला तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला.

    या अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरील भाग पुरता चक्काचूर झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पथकासह घटनास्थळ गाठून जखमी चालक उपचारार्थ रुग्णालयाकडे रवाना केले. पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालक अरविंद ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास केला जात आहे.