दुचाकी-टेम्पोमध्ये भीषण अपघात; एक तरूण ठार; खेड कुंभाड पुलाजवळील घटना

मालवाहू टेम्पोला दुचाकीची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कुंभाड ते खोपी मार्गावरील पुलाजवळ घडली.

    खेड : मालवाहू टेम्पोला दुचाकीची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कुंभाड ते खोपी मार्गावरील पुलाजवळ घडली.

    अंकित तांबे (वय २८, रा. कुंभाड, ता. खेड) असे यामध्ये ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला असून, त्याला कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृत अंकित तांबे हा दुचाकीने कुंभाड ते खोपीसाठी दुचाकीवरून जात होता. त्याची दुचाकी भरधाव वेगाने जात होती. त्याचदरम्यान खोपीकडून कुंभाडकडे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला कुंभाड पुलाजवळ दुचाकीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की, अंकितचा जागीच मृत्यू झाला.

    अंकित याच्यासोबत असणारा अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंकित हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.