भरधाव दुचाकीसमोर माकड आडवं आल्याने अपघात; माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात तरूण ठार, दोनजण जखमी

भरधाव दुचाकीसमोर माकड आडवे आल्याने त्यांना वाचविण्याच्या नादात दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. संगम धंदरे (27, रा. सावंगी मेघे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पकंज ठाकरे (28, रा. सावंगी मेघे), विलास कांगदे (55, रा. कळंब) असे जखमीचे नाव आहे.

    भिडी : भरधाव दुचाकीसमोर माकड आडवे आल्याने त्यांना वाचविण्याच्या नादात दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. संगम धंदरे (27, रा. सावंगी मेघे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पकंज ठाकरे (28, रा. सावंगी मेघे), विलास कांगदे (55, रा. कळंब) असे जखमीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी येथून कळंबला जाण्यासाठी संगम धंदरे बरोबर अन्य दोघे (एमएच 32 एटी 7717) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. दरम्यान भिडीनजीक असलेल्या शिरपूर होरे गाव परिसरात भरधाव दुचाकीसमोर अचानक माकड आडवे आले. त्यांना वाचविण्याच्या नादात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी मार्गावरील दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.

    या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींनी भीडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच संगम धंदरे याचा मृत्यू झाला. पंकज ठाकरे व विलास कांगदे यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. स्थिती नाजूक असल्याने पुढील उपचारासाठी वर्धा येते हलविण्यात आले. या प्रकरणी देवळी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.