एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; एक ठार तर 20 प्रवासी गंभीर, अपघात इतका भीषण होता की…

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात असणाऱ्या सिल्लोड येथे एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. सिल्लोडजवळ एसटी बस आणि सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात एक ठार तर 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात असणाऱ्या सिल्लोड येथे एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. सिल्लोडजवळ एसटी बस आणि सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात एक ठार तर 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गॅस वाहतूक करणारा टेम्पो भराडीकडून सिल्लोडला येत होता तर सिल्लोड-पाचोरा ही बस सिल्लोडकडून पाचोराकडे जात होती. वांगी फाट्याजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकजण ठार झाला. तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघातात गॅस वाहतूक करणारा ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

बसमध्ये 35-40 प्रवासी

अपघातग्रस्त बसमधून 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी असलेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात येत आहे.

सुदैवाने दुर्घटना टळली

अपघातात ट्रकमधील सिलेंडर रस्त्यावर पडले. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. रस्त्यांवर काचांचे तुकडे मोठ्या प्रमाणात पडले होते. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक चालकाचा मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढावा लागला.