दुचाकी-कंटेनरमध्ये भीषण अपघात; 24 वर्षीय तरुण ठार; मालेगावातील टेहरे येथील घटना

दुचाकी व टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका 24 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मालेगाव टेहरे येथील हुतात्मा चौकातील हॉटेल राजधानीसमोर (Accident in CIDCO) महामार्गावर घडली. योगेश विजय कोळी (24, रा. परसामळ, ता. शिदखेडा, धुळे) असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

    सिडको : दुचाकी व टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका 24 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मालेगाव टेहरे येथील हुतात्मा चौकातील हॉटेल राजधानीसमोर (Accident in CIDCO) महामार्गावर घडली. योगेश विजय कोळी (24, रा. परसामळ, ता. शिदखेडा, धुळे) असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कोळी परिवारासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत योगेश कोळी हा दुचाकीने नाशिकहून धुळेकडे जात असताना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास टेहरे गावाजवळील हुतात्मा चौक येथे भरगाव वेगाने आलेला कंटेनर (क्र. एमएच ४६ एआर ०५९५ ) दुचाकीवर पलटी झाला. यात योगेश कोळी हा गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित उपचारासाठी मालेगाव येथील खासगी आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    दरम्यान, रस्त्यावर कंटेनर पलटी झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढोकणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात कंटेनरचालक शरद परदेशी (३६, रा. भामरूळ बहाळ, ता. भडगाव, जि. जळगाव) याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.