दौंड शुगरमध्ये दुर्घटना, दोन कामगारांचा मृत्यू

आलेगाव (ता.दौंड ) परिसरातील शुगर साखर कारखान्यात गरम पाण्याच्या टाकीत पडून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.रविवारी(दि ३)सकाळी ही दुर्घटना घडली. याप्रकरणी दौंड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

    देऊळगावराजे: आलेगाव (ता.दौंड ) परिसरातील शुगर साखर कारखान्यात गरम पाण्याच्या टाकीत पडून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.रविवारी(दि ३)सकाळी ही दुर्घटना घडली. याप्रकरणी दौंड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

    दुर्घटनेत संदीप कुंडलिक गरदाडे ( वय २३, रा.पेडगाव ता.दौंड ),गणेश सिताराम शिंदे ( वय २३,रा.शेडगाव पिसारे,ता.करमाळा,जि.सोलापुर ) या कामगारांचा मृत्यू झाला. याबाबत फारुक दुगे यांनी पोलिसांना खबर दिली. कारखान्यांच्या नवीन प्लॅटच्या इजकराम चॅनलच्या गरम पाण्याचे टाकी लाईनमध्ये संदीप हा फोमवर पाणी मारण्याचे काम करीत होता.

    यावेळी एका गरम पाण्याच्या टाकीमध्ये पाय घसरुन तो पडला,त्याला टाकीत पडलेला पाहून खलाशी म्हणून काम करीत असलेला गणेश वाचविण्यासाठी गेला असता, तो पण टाकीत पडला. दोघांना इतरांच्या मदतीने टाकीतून बाहेर काढले असता ते मयत झाल्याचे दिसूनन आले. त्यांना उपचारासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतिश राऊत करीत आहेत .