मैत्रिणींसोबत नाष्टा करण्याचा ‘तो’ प्लॅन अखेरचा ठरला ! कारचा अपघात झाला अन्…

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारी क्रितीका कौर साधू (Kritika Kaur) हिने मैत्रिणींसोबत नाश्ता करण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला होता. मात्र, क्रितीकाच्या कारला अपघात (Car Accident) झाला. ज्यात ती गंभीर जखमी झाली अन् तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    पिंपरी : एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारी क्रितीका कौर साधू (Kritika Kaur) हिने मैत्रिणींसोबत नाश्ता करण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला होता. मात्र, क्रितीकाच्या कारला अपघात (Car Accident) झाला. ज्यात ती गंभीर जखमी झाली अन् तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मैत्रिणींसोबत केलेला तिचा हा शेवटचा प्लॅन ठरला असेच म्हणावे लागेल.

    हा अपघात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलावर घडला. यात क्रितीकाची मैत्रीण दिगज्योत धिमन (वय 23) हिच्या मालकिची कार (गाडीचा क्रमांक DL4CAW3642) होती व दिगज्योतच कार चालवत होती. क्रितीका व दिगज्योत सह मानी तोमर (वय 23), लुईस बारीतो (वय 24), दृष्टी ठक्कर, अनुष्का यादव या चार मैत्रिणी ही गाडीमध्ये होत्या.

    या सर्वजणी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होत्या. त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे मैत्रिणींनी थेरगाव येथे जाऊन नाश्ता करण्याचा प्लॅन केला. प्लॅननुसार त्या थेरगावच्या दिशेने नाश्ता करण्यासाठी जात होत्या, अशी माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली. परंतु, रस्त्यातच गाडीचा अपघात झाला. यावेळी गाडी चालवत असलेल्या दिगज्योतचे गाडीवरचे नियंत्रण सुटले अन गाडी थेट दुभाजकावर आदळून पलटली झाली. यात साऱ्या मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या होत्या.

    सर्वांना तात्काळ थेरगाव येथील रुग्णालायात हलवण्यात आले. मात्र, क्रितीकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने महाविद्यालय व या मैत्रिणींच्या इतर मित्र-मैत्रिणीमध्ये दु:खाचे वातावरण पसरले आहे. यात गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. अगदी हसत खेळत मैत्रिणींसोबत वेळ घालवणाऱ्या क्रितीकासाठी मात्र हा प्लॅन शेवटचा ठरला.