
अजय मिसर हे श्रीरामपूर न्यायालयातून मुंबईला न्यायालयीन कामानिमित्त जाताना इगतपूरच्या भरवीरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अजय मिसर जखमी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महामार्गावरील अपघातांच्या घटनेत मोठी वाढ होताना दिसत आहे. समृद्धी महामार्गावरही अपघातांचं सत्र सुरुच असलयाचं पाहायला मिळत आहे. याच महामार्गावरून इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात एक भीषण अपघात झाला आहे. मुंबईला जाताना नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.
अजय मिसर हे श्रीरामपूर न्यायालयातून मुंबईला न्यायालयीन कामानिमित्त जाताना इगतपूरच्या भरवीरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अजय मिसर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कसा झाला अपघात?
अजय मिसर हे श्रीरामपूर ते मुंबई असा नाशिकमार्गे प्रवास करत होते. दुपारी त्यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून मार्गस्थ होत होता. घोटी ओलांडल्यानंतर इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात त्यांचे वाहन समोरच्या ट्रकवर जाऊन आदळले. यामुळे त्यांच्या पायांना आणि चेहऱ्याला दुखापत झाली. त्याशिवाय त्यांच्या खांद्याला मुका मार लागला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलिस आणि रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींवर तिथेच प्रथमोपचार देण्यात आले. दरम्यान वकील अजय मिसर यांच्यासह सहाय्यक वकील वाहनचालक यांची प्रकृती स्थिर आहे.