लातूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात; 8 ते 10 जण जखमी

पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा लातूर-मुरूड महामार्गावर अपघात झाला आहे. चालकाचा नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली. खिडकीच्या काच फोडून प्रवाशी बाहेर आले. अपघातात 8 ते 10 प्रवाशी जखमी झाले आहेत.

    लातूर : पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा लातूर-मुरूड महामार्गावर अपघात झाला आहे. चालकाचा नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली. खिडकीच्या काच फोडून प्रवाशी बाहेर आले. अपघातात 8 ते 10 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना 108 रूग्णवाहिकेनं रूग्णालयात हलवलं आहे. सुदैवाची बाब म्हणजे, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर लातूर वरून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्साचा रात्री 12च्या सुमारास अपघात झाला आहे. चालकांचं नियत्रंण सुटल्यानं ट्रॅव्हल्स पुलावरून खाली कोसळली आणि अपघात झाला. हा अपघात पुण्याकडे जात असताना लातूर- मुरुड महामार्गावर झाला आहे. अपघातावेळी 38 प्रवासी ट्रॅव्हल्स मध्ये होते. अपघातात 8 ते 10 प्रवाशी जखमी झाले आहेत. प्रवाशी काच फोडून बाहेर आले, प्रवाशांनी रुग्णावाहिकाला तात्काळ फोन केला. जखमींच्या हाताला, पायाला मार लागला आहे.

    अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अभिनव ट्रॅव्हल्सची उदगीर- पुणे आणि पुणे- उदगीर अशी सेवा चालू आहे. या ट्रॅव्हल्सला दोन चालक असतात. अपघातात एका चालकाला मार लागला. जखमींना वैद्यकीय औपचारासाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासयकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.