भरधाव वेगातल्या दुचाकीची चारचाकीला धडक, एकाचा मृत्यू; सहप्रवासी जखमी

बाजीराव रस्त्यावर भरधाव दुचाकीने चारचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर, सहप्रवासी तरुण जखमी झाला आहे. राणाप्रताप उद्यानासमोर मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

    पुणे : बाजीराव रस्त्यावर भरधाव दुचाकीने चारचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर, सहप्रवासी तरुण जखमी झाला आहे. राणाप्रताप उद्यानासमोर मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात गुंजन दत्तात्रय सोनवणे (वय २५, रा. कोथरुड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सहप्रवासी तरुण शुभम गवांदे हा जखमी झाला आहे. याबाबत दिलीप पुरोहित (वय २१, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारचाकी चालक पुरोहित मध्यरात्री दोनच्या सुमारास बाजीराव रस्त्याने जात होते. तेव्हा दुचाकीस्वार सोनवणे आणि त्याचा मित्र गवांदे भरधाव वेगाने आले. राणाप्रताप उद्यानासमोर त्यांनी पुरोहित यांच्या चारचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात सोनवणे गंभीर जखमी झाला. सोनवणे व त्याचा मित्र गवांदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच सोनवणेचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव अधिक तपास करत आहेत.